आज 665 पॉझिटिव्ह! 5 तालुक्यांत कोरोनाचा उद्रेक!! चाचण्या वाढल्या, पॉझिटिव्हीटी घटली

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचे सावट असलेल्या गुड फ्रायडेला जिल्ह्यात 668 कोरोना पॉझिटिव्ह आढळले. अनेक दिवसांपासून शांत असलेल्या 5 तालुक्यांत कोविडने घेतलेली उसळी ही धोक्याची घंटी तर पॉझिटिव्हीटी दरात झालेली घट हाच दिलासा ठरावा, असे संमिश्र चित्र आहे. नमुने संकलन व चाचण्या अहवाल कमी असले तरी बुलडाणा व खामगाव हे तालुके …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचे सावट असलेल्या गुड फ्रायडेला जिल्ह्यात 668  कोरोना पॉझिटिव्ह  आढळले. अनेक दिवसांपासून शांत असलेल्या 5 तालुक्यांत कोविडने घेतलेली उसळी ही धोक्याची घंटी तर पॉझिटिव्हीटी दरात झालेली घट हाच दिलासा ठरावा, असे संमिश्र चित्र आहे.

नमुने संकलन व चाचण्या अहवाल कमी असले तरी बुलडाणा व खामगाव हे तालुके कमी पडायला तयार नाहीत, असे चित्र आहे. एप्रिल फुलच्या मुहूर्तावर या दोघांनी प्रत्येकी डबल व सिंगल सेंच्युरी गाठून आरोग्य यंत्रणांना हादरवून सोडले होते. त्यातुलनेत आज, 2 एप्रिलला बुलडाणा 93 रुग्‍ण व खामगाव 57 रुग्‍णांची संख्या कमी आली, हा एकप्रकारे दिलासाच म्हणावा काय?  हा प्रश्नच  ठरावा.  शेगावने पुन्हा 54 चा आकडा गाठला. मात्र मागील आठवडाभर शांत  असलेल्या 5 तालुक्‍यांत कोरोनाने मारलेली मुसंडी हे किरकोळ दिलासे व्यर्थ ठरविण्यास समर्थ आहेत.  मेहकर 95, लोणार 85, मोताळा 50, सिंदखेड राजा 48, संग्रामपूर 42 हे ते तालुके आहेत. या तुलनेत मलकापूर 39, जळगाव जामोद 36, नांदुरा 15, चिखली 27, देऊळगावराजा 25 या तालुक्यांतील कोरोना  किमान आज तरी नियंत्रणात आहे. दरम्यान नमुने संकलन  व चाचणी यांचा वेग वाढला आहे. गत 24 तासांत 6610 नमुने संकलन करण्यात आले. त्यापैकी 6002 अहवाल मिळाले. त्यातील 665  पॉझिटिव्ह तर 5321 निगेटीव्ह आलेत. पॉझिटिव्हीटी रेट 11.07 टक्के इतका म्हणजे एकूण सरासरी 14.07 टाकेच्या तुलनेत कमी आहे. हा तांत्रिक दिलासा यंत्रणांची हिंमत वाढविणारा ठरावा.s