वाहऽऽ दिवसभरात २५ हजार नागरिकांचे लसीकरण!

 
corona
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना लसीकरणात राज्यात लक्षणीयरित्या माघारलेल्या बुलडाणा जिल्ह्याने दिवाळी संपताच नव्याने नियोजन करून कठोर पावले उचलली आहेत. परिणामी रविवारपासून लसीकरणाची गती वाढली असून, आज, १० नोव्‍हेंबरला तब्बल २५ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आरोग्य विभागासह सर्वच यंत्रणा कामाला लावत सूक्ष्म नियोजन करायला सांगितले. रोज व्हीसीद्वारे आढावा घेणे सुरू केले. याचा परिणाम सोमवारपासून जाणवू लागला आहे. सोमवार व  मंगळवारला अनुक्रमे १४ ते १५ हजार लसीकरण झाले. आज १० तारखेला एकाच दिवशी जिल्ह्यात पहिल्यांदाच २५ हजार नागरिकांना लस देण्यात आली. यापुढे याहीपेक्षा जास्त गतीने लसीकरण करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे. सूत्रानुसार आतापर्यंत ५५ टक्‍के लसीकरण झाले आहे.