काळजी करण्यासारखे... कोरोना पसरतोय, आज ४ बाधित!

उपचार घेणाऱ्यांचा आकडा १४ वर!!
 
 
corona
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचे वाढते रुग्‍ण पुन्‍हा एकदा धडकी भरवत आहेत. जिल्ह्यात आज, 17 नोव्हेंबरला कोरोनाचे नवे 4 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले आहेत. त्‍यामुळे उपचार घेणाऱ्यांचा आकडा 14 वर गेला असून, दिवसभरात दोन रुग्णांना बरे झाल्याने रुग्‍णालयातून सुटी देण्यात आली.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 340 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 336 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 4 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील चाचणीमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 110 तर रॅपिड टेस्टमधील 226 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : रामनगर 1, इतापे ले आऊट 1, डॉ. संचेती हॉस्पिटलजवळ 2 व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत 734687 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86945 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 75 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87633 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 14 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 674 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.