आजचा कोरोनाचा "असा' आहे अहवाल!

तुम्‍ही म्‍हणाल, बरंच झालं!!
 
corona

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 3 नोव्‍हेंबरला कोरोनाचा एकही रुग्‍ण आढळला नाही. सध्या 9 बाधित रुग्‍ण उपचार घेत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनिटायझर वापरणे, सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रिसूत्रींचा अवलंब करावा. पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 56 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. सर्वच 56 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 19 व रॅपिड टेस्टमधील 38 अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत 86932 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 19 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87615 कोरोनाबाधित रुग्ण असून, आजपर्यंत 674 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.