उपचार घेणाऱ्यांचा आकडा चारच दिवसांत दोनशेच्या घरात!; आज ४६ नवे कोरोनाबाधित!!

 
corona
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना झाल्याने उपचार घेणाऱ्यांची संख्या चारच दिवसांत दोनशेच्या घरात गेली आहे. आज, 10 जानेवारीला 46 नवे कोरोनाबाधित समोर आले असून, यात बुलडाणा शहरातील तब्‍बल 19 रुग्‍णांचा समावेश आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 683 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 637 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 46 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील 43 व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 588 तर रॅपिड टेस्टमधील 49 अहवालांचा समावेश आहे.

आजपर्यंत 753267 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 87001 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 651 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87859 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत 182 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 676 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले रुग्ण
बुलडाणा शहर :19, बुलडाणा तालुका : उमाळा 1, मोताळा तालुका : पोफळी 1, चिखली तालुका : धोत्रा नाईक 1, शेगाव शहर : 7, शेगाव तालुका : येऊलखेड 1, खेर्डा 3, खामगाव शहर : 4, मेहकर शहर : 1, नांदुरा शहर : 4, लोणार तालुका : खळेगाव 2, जळगाव जामोद तालुका : पळशी वैद्य 1, बोराळा 1.