मेहकर तालुक्यातील सावत्रा गावचे शेतकरी, कृषी सहाय्यक आणि मंडळ अधिकाऱ्याला वैतागले! मंडळ अधिकारी म्हणे, तुमच्याकडून जे होते ते करून घ्या...

 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील सावत्रा गावात कृषी सहाय्यक तसेच कृषी मंडळ अधिकारी सतत गैरहजरअसतात, शेतकऱ्यांचे कामे करत नाहीत अशी तक्रार सावत्रा चे ग्रामस्थ वैभव निकस, गजानन रा.निकस,प्रदीप ते.निकस,दीपक निकस यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दिली आहे.
कृषी सहाय्यक शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करणारा महत्त्वाचा घटक आहे. मात्र सावत्रा येथील कृषी सहाय्यक श्रीमती लाकडे सतत गैरहजर असतात, इतकचं नाही तर सोबतीला कृषी मंडळ अधिकारी रायपूरे अर्वाच्च भाषेत धमकी देतात. तुमच्याकडून जे होते ते करुन घ्या, मी व मॅडम तुमच्या गावात येऊ शकत नाही, तुमची कामे सोयीनुसार करू अशा शब्दांत कृषी मंडळ अधिकारी रायपूरे गावातील शेतकऱ्यांशी बोलतात. तसेच तालुका मुख्यालयी गेल्यावर तासनतास ताटकळत ठेवतात. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. असे तक्रारीत म्हटले आहे..