ओळखा हीच ती संधी...!; १३,१४,२७,२८ नोव्‍हेंबरला करून घ्या "हे' काम!

 
collector office
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मतदार यादीतील नावात दुरुस्ती करणे, वगळणे किंवा नवीन नाव नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात १३, १४ व २७, २८ नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम निवडणूक विभागाने आयोजित केली आहे.
ज्या मतदारांनी अद्यापही मतदार यादीत नाव नोंदविलेले नाही, त्‍यांनी मतदान केद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावे. ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार मतदार यादीतील नाव दुरुस्त करणे, नाव वगळणे तसेच नविन नाव नोंदणी प्रक्रिया गावातील नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचाव्यात याकरिता १६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांत विशेष ग्रामसभेचे आयोजन करून मतदार यादीचे वाचन होणार आहे. विशेष ग्रामसभेस सर्व नागरिकांनी उपस्थित राहून मतदार यादीतील नाव अद्ययावत, नवीन नोंदणी किंवा वगळायचे असल्यास वगळून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, उपजिल्हाधिकारी श्रीमती गौरी सावंत यांनी केले आहे.