चिखलीतील कोरोनाबाधितामुळे पुन्हा आकडा ७ वर!
Nov 13, 2021, 20:11 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एकेक रुग्ण बरा करून जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासन झटत असताना दुसरीकडे निष्काळजीपणा करून कोरोना अंगावर ओढून घेणाऱ्यांची संख्या मात्र अजिबात कमी नाही. आज, 13 नोव्हेंबरला चिखली शहरातील खंडाळा रोडवरील एका बाधितामुळे पुन्हा उपचार घेणाऱ्यांची संख्या 7 वर गेली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 194 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 193 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये रॅपिड ॲटींजेंट चाचणीमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 71 तर रॅपिड टेस्टमधील 122 अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत 733772 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86943 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 60 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87624 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोविडचे 7 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 674 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.