विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही-आमदार सौ. महाले पाटील

चिखली मतदारसंघात विविध विकासकामांचे भूमिपूजन
 
भूमिपूजन
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना काळामुळे दोन वर्षे वाया गेली. कोरोनाचा बहाणा करून राज्य सरकारने सर्व निधी गोठवून ठेवले. मायबाप सरकार म्हणून देण्याची जबाबदारी सरकारची असतानाही मागील सरकारने दिलेले परत घेण्याचा करंटेपणा या आघाडी सरकारने केलेला आहे. तरीसुद्धा चिखली विधानसभा मतदार संघातील विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये खेचून आणलेले आहेत. भविष्यात सुद्धा कोणत्याही विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी केले.

चिखली विधानसभा मतदार संघातील १० कोटी रुपये विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या. काल, १ नोव्‍हेंबरला चिखली विधानसभा मतदारसंघातील साकेगाव येथील ३ कोटी रुपये किमतीचे २ पूल, ४ कोटी ६० लक्ष रुपयांचे पारध- धामणगाव- धाड रस्ताचे रुंदीकरण व मजबुतीकरण आणि २ कोटी रुपयांच्‍या जामठी- धाड रस्त्याची धाड गावातील काँक्रिटीकरणासह सुधारणा करणे या कामांचे भूमिपूजन आमदार  सौ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते साकेगाव, धाड, धामणगाव याठिकाणी पार पडले.

यावेळी पंचायत समिती सभापती सौ. सिंधुताई तायडे, उपसभापती सौ. शमशाद पटेल, पंचायत समिती सदस्या सौ. वैशाली कऱ्हाडे, ज्‍येष्ठ नेते रामदास देव्हडे, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे, शहराध्यक्ष पंडीत देशमुख, सौ. द्वारकाताई भोसले, प्रा. वीरेंद्र वानखेडे, अनमोल ढोरे, कृष्णा जाधव, रितेश पवार, सौ. उर्मिला पवार, जगन्‍नाथ लोखंडे, गुलाबसिंह परीहार, सुनील इंगळे, संजय निकाळजे, मंगेश इंगळे, अमोल सोनवणे, गणेश परिहार, कैलास धोत्रे, सौ. मीनाताई जाधव, कांताबाई धोत्रे, मोतीसिंह परिहार, तेजराव सोनवणे, सुनील परिहार, सोपान जगताप, योगेश जगताप, अक्षय जगताप, संतोष इंगळे, मदन इंगळे आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.