Good News! चिखलीत आमदार श्वेताताई महाले उभारणार स्‍वखर्चातून कोविड रुग्‍णालय!; कोरोनाबाधितांवर करणार मोफत उपचार

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांना दवाखान्यात बेड मिळत नाही. खासगी दवाखान्यात पैसे देऊनही बेड उपलब्ध होत नाही. रुग्ण व त्यांचे नातेवाईक बेडसाठी फिरत आहेत. रुग्ण व नातेवाइकांना दिलासा देण्यासाठी आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या वतीने चिखली शहरात 50 खाटांचे आधार कोविड रुग्णालय सुरू करणार आहेत. या रुग्णालयात मोफत …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः  दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांना दवाखान्यात बेड मिळत नाही. खासगी दवाखान्यात पैसे देऊनही बेड उपलब्ध होत नाही. रुग्ण व त्यांचे नातेवाईक बेडसाठी फिरत आहेत. रुग्ण व नातेवाइकांना दिलासा देण्यासाठी आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या वतीने  चिखली शहरात 50 खाटांचे  आधार कोविड रुग्णालय सुरू करणार आहेत. या रुग्‍णालयात मोफत उपचार केले जातील.

याबाबत  काल, 29 एप्रिलला श्रीराम नागरी पतसंस्थेच्या जिजाऊ सभागृहात बैठक होऊन नियोजन करण्यात आले. या रुग्णालयात मोफत उपचार मिळणार असल्याने गोरगरीब रुग्णांना फार मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे ज्‍येष्ठ नेते सतीश गुप्त यांनी यावेळी केले. बैठकीला भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, ज्येष्ठ नेते रामदास देव्हडे, सभापती सौ. सिंधुताई तायडे, ॲड. सुनील देशमुख , संतोष काळे पाटील, नगरसेवक शैलेश बाहेती , बंडू कुलकर्णी, संजय आतार , सुदर्शन खरात ,विजय नकवाल, सुभाष आप्पा झगडे , गोविंद देव्हडे,  चेतन देशमुख, संदीप उगले, विजयभाऊ गवते, मंदार बाहेकर, नामु गुरुदासानी, सौ. द्वारका भोसले, सौ. मनीषा सपकाळ, ज्ञानेश्वर सवडे, किशोरभाऊ जामदार, रेणुकादास मुळे, दीपक शेळके, योगेश राजपूत, किशोर चेके, संजय भोसले, दत्ता भाऊ शेवाळे, शंकर तरमळे यांची उपस्थिती होती.