Good News! चिखली नगरपरिषदेच्‍या हद्दवाढीला मान्यता; आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांना मोठे यश

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनेक दिवसांपासून रखडत पडलेल्या चिखली नगरपरिषदेच्या हद्दवाढीला अखेर राज्य शासनाने मान्यता दिली आहे. आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या अथक प्रयत्नांना यामुळे फार मोठे यश आल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने आज, 30 मार्च रोजी चिखली नगरपरिषदेच्या हद्दवाढीची उपसचिव सतीश मुंडे यांच्या सहीने घोषणा केली आहे . …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अनेक दिवसांपासून रखडत पडलेल्या चिखली नगरपरिषदेच्‍या हद्दवाढीला  अखेर राज्य शासनाने मान्यता दिली आहे. आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या अथक प्रयत्नांना यामुळे फार मोठे यश आल्‍याचे मानले जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने आज, 30 मार्च  रोजी चिखली नगरपरिषदेच्या हद्दवाढीची उपसचिव सतीश मुंडे यांच्या सहीने घोषणा केली आहे . ही हद्दवाढ पूर्वेकडून चिखली भाग क्रमांक 2 गट क्रमांक 166, 167, 168, 170 ते 180 उत्तर 179 भाग एमआयडीसी वगळून 185, 191, 192 भाग एमआयडीसी वगळून 193 भाग एमआयडीसी वगळून 194 ते 200 209 ते 220 , 223 ते 230, चिखली नगरपरिषदेच्या पश्चिमेकडील सर्वे क्रमांक व गट क्रमांक चिखली भाग 2 , 37 ते 45 ,49 ,50 52 ते 54 तसेच चिखली नगर परिषदेच्या उत्तरेकडील सर्वे क्रमांक व गट क्रमांक चिखली भाग दोन 107 ,108, 152 ,153, 156, 157, 161 162, 165  तर चिखली नगरपरिषदेच्या दक्षिणेकडील सर्वे क्रमांक व गट क्रमांक चिखली भाग क्रमांक दोन आठ ते 13 पाणी 20 ते 22 प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून परिपूर्ण प्रस्ताव नसल्याने हद्दवाढ रखडली होती.

शहराच्या विकासाला गती मिळणार

चिखली शहराची हद्दवाढ मंजूर झाल्याने झपाट्याने वाढत असलेल्या चिखली शहरातील वाढीव भागात आता नागरी सुविधा देण्यासाठी सोयीचे होणार आहे. हद्दवाढ मंजूर झालेला भाग ग्रामीण व शहरी असा दोन्ही असल्याने आणि नागरी वस्ती ही चिखली शहरात येत नसल्याने पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, रस्ते अशा मूलभूत सुविधा देता येत नव्हत्या. आता हद्दवाढ झाल्याने वाढीव भागात नागरी सुविधा देण्याच्या अडचणी दूर झाल्या आहेत. चिखली शहराची हद्दवाढ झाल्याने सफाई कामगार यांची पदे सुद्धा वाढणार आहे.

आमदार सौ. महाले पाटील यांनी दिले होते पत्र

आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी हद्दवाढीसाठी सतत पाठपुरावा केला. २२ डिसेंबर २०२० रोजी नगरविकास प्रधान सचिव यांना याबाबत पत्र दिले होते. पत्रात म्हटले होते की , चिखली नगरपरिषदेची विद्यमान हद्द १० सप्‍टेंबर १९८७ रोजी मंजूर झाली असून, नगरपरिषदेचे क्षेत्रफळ ७.८८९ चौ. कि.मी. एवढे आहे. तसेच सन १९८१ च्या जनगणनेनुसार चिखली शहराची लोकसंख्या २७६०६ एवढी होती. तेव्हापासून चिखली शहराची हद्दवाढ झालेली नाही. सन २०११ रोजी झालेल्या जनगणने नुसार चिखली शहराची लोकसंख्या ५७,८८९ एवढी आहे. तसेच नगरपरिषद चिखली हद्दीबाहेर झपाट्याने विस्तार होत असून निवासी व वाणिज्य क्षेत्र निर्माण होत आहे. चिखली शहराच्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून व वाढीव क्षेत्रातील नागरिकांना मुलभुत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी होत असलेल्या अडचणी सोडविण्याकरिता चिखली नगर परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत २२ ऑगस्‍ट २०१९ रोजी हद्दवाढीस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव आपल्याकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी १० मार्च २०२० रोजी  मंत्री एकनाथ शिंदे व प्रधान सचिवांची प्रत्यक्ष भेट घेऊन ८ सप्‍टेंबर २०२० रोजी चिखली नगर परिषदेच्या हद्दवाढीस मान्यता देणेबाबत पत्र दिले होते. तेव्हापासून आ.श्वेताताई महाले यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रस्तावाची हालचाल सुरू झाल्या होत्‍या.