गुरूनानक जयंतीदिनी दिव्यांग तपासणी बोर्ड रद्द

 
दिव्यांग
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा रुग्णालयात नियमितपणे दिव्यांग बोर्ड सुरू असून, येणाऱ्या शुक्रवारी, १९ नोव्हेंबरला गुरूनानक जयंती आहे.
जयंती निमित्ताने शासकीय सुटी असल्यामुळे तिसऱ्या शुक्रवारी जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण, मतिमंद व कान, नाक, घसा संबंधित दिव्यांग तपासणी बोर्ड रद्द करण्यात येत आहे. नागरिकांनी जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग तपासणीस येऊ नये. आल्यास झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.