BREAKING डॉ. सौरभ संचेंतींचे अश्लील व्हिडिओ काढून खंडणी उकळण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट! पोलिसांचा हाती लागला...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ऑक्टोबर महिन्यात झालेल्या डॉ.सौरभ संचेती यांच्याकडून खंडणी उकळण्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. जिल्हाभर या प्रकरणाची चर्चा झाली होती. १८ ऑक्टोबरला घडलेल्या या प्रकरणात १९ ऑक्टोबरला बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यापैकी ५ आरोपींना पोलिसांनी २० ऑक्टोबरच्या पहाटे पर्यंतच अटक केली होती. दरम्यान आता या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे..
 काय घडल होत...
बुलडाणा शहरातील नामवंत हृदयरोगतज्ञ डॉ सौरभ संचेती यांना १३ ऑक्टोबरला रुग्ण तपासण्याच्या बहाण्याने खामगाव रोडवरील एका घरात बोलावण्यात आले होते. तिथे ७ जणांच्या टोळक्याने डॉ.संचेती यांना कपडे काढायला लावले,त्यांचे अश्लील व्हिडिओ काढले आणि नंतर ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून ८ लाख उकळले होते. दरम्यान या घटनेनंतर १८ ऑक्टोबरला दीक्षांत नवघरे या तरुण डॉक्टरांच्या हॉस्पिटल मधील केबिन मध्ये गेला आणि पुन्हा पैशांची मागणी केली..त्यामुळे हा प्रकार असाच सुरू राहिला तर धोकादायक होईल असे वाटल्याने डॉक्टरांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अजय नागपुरे, दीक्षांत नवघरे, आदेश राठोड, सूरज पसरटे , विशाल गायकवाड यांना अटक केली होती. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हे अट्टल गुन्हेगार असल्याने पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले होते. याआधी यातील दोन आरोपींनी समलिंगी संबंधांतून एका कक्षसेवकाचा खून केला होता.
Bxbd
पोलिसांच्या हाती लागला...
दरम्यान या घटनेनंतर २ आरोपी फरार होते. पोलिसांना ते सातत्याने चकमा देत होते. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी अनेक महत्वाचे पुरावे जमा केले होते. दरम्यान फरार आरोपी मधील संतोष उर्फ अठ्ठ्या रमेश शर्मा(२४, रा.शिवनेरी नगर, वॉर्ड न ७, बुलडाणा) या आरोपीच्या पोलिसांनी आज,२३ डिसेंबरला मुसक्या आवळल्या. गेल्या २ महिन्यांपासून तो गायब होता, तो बुलडाणा शहरात आल्याची पक्की खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक केली.
ही कारवाई ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रभाकर लोखंडे, रवींद्र डुकरे,पंजाबराव साखरे, सुनील जाधव, पोकॉ युवराज शिंदे, शिवहरी सांगळे, गजानन जाधव, गंगेश्र्वर पिंपळे यांनी केली.