जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगणवाडी सेविकांचे निदर्शने! तीव्र आंदोलनाची केली घोषणा..
Dec 26, 2023, 16:42 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):आज २६ डिसेंबरला अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. मागण्यांबाबत विचार न झाल्यास ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या औचित्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.
४ डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका, मदतनीस बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकारने अजूनही याविषयी आपली भूमिका मांडली नाही. त्यामुळे आक्रमक पवित्रा धारण करावा लागत असल्याचे आंदोलन महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या आंदोलने उपोषण सुरूच आहे. सरकारने यांच्याकडे तातडीने लक्ष द्यावे अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी बोलून दाखविला.यावेळी शेकडो अंगणवाडी महिला कर्मचारी एकत्रित जमल्या होत्या.