आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा आणि खामगाव येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी http://swayam.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर आपले ऑनलाइन अर्ज भरून हार्डकॉपीसह शैक्षणिक कागदपत्रे वसतिगृह कार्यालयात ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत सादर करावे. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच मोबाईल क्रमांक नोंद करावा. हा मोबाईल क्रमांक बँक खात्यासोबत तसेच आधार क्रमांकासोबत लिंक केलेला असावा. ऑनलाईन अर्जामध्ये स्वत:चे नाव नोंदणी करताना ते आधार कार्डवरील नावाप्रमाणे जुळणारे असावे. अर्ज भरताना आधारकार्ड अपडेट करून घ्यावे. विद्यार्थ्यांनी बँक खाते किंवा मोबाईल क्रमांक बंद असल्यास अर्ज भरण्यापूर्वी सुरू करून घ्यावे. बँक खात्याची नोंद करताना स्वत:चेच बँक खात्याची नोंद करावी किंवा पालकाचे संयुक्तीक खाते असावे. अर्ज करताना विद्यार्थ्यांनी कागदपत्राची स्वच्छ प्रत संकेतस्थळावर अपलोड करावी. तसेच प्रवेशासाठी जातीचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, वर्ग १० वी चे बोर्ड प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड प्रत, गुणपत्रिका, पासपोर्ट दोन फोटो आदी अर्जासोबत अपलोड करावे. इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन गृहपाल आदिवासी शासकीय मुलांचे वसतिगृह, बुलडाणा व खामगाव यांनी केले आहे.