कोरोनाच्‍या तीन नव्या रुग्‍णांची भर!

उपचार घेणाऱ्यांची संख्या ९ वर
 
corona
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 2 नोव्‍हेंबरला कोरोनाचे 3 रुग्‍ण समोर आले आहेत. त्‍यामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्या 9 वर गेली आहे. चिखली तालुक्‍यातील बोरगाव काकडेत एक, लोणार तालुक्‍यातील सुलतानपुरात एक, यवतमाळच्या एका व्यक्‍ती जिल्ह्यात कोरोना झाला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 305 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 302 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 3 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळा चाचणीतील 2 व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 71 तर रॅपिड टेस्टमधील 231 अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत 731715 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86932 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 25 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87615 कोरोनाबाधित रुग्ण असून, आजपर्यंत 674 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.