गोठ्यास आग लागून दोन गायींचा होरपळून मृत्‍यू

बुलडाणा तालुक्‍यातील घटना, साडेतीन लाख रुपयांचे नुकसान
 
fire
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गोठ्यास आग लागून दोन गायींचा होरपळून मृत्‍यू झाला. मोटारसायकल, चारा व शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाले. एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना म्‍हसला बुद्रूक (ता. बुलडाणा) येथे १३ नोव्‍हेंबरला रात्री घडली.
विठ्ठल त्र्यंबक काळे (रा. मौंढाळा) यांची म्‍हसला शिवारात शेती आहे. १३ नोव्‍हेंबरला गुरानां चारापाणी करून ते झोपले होते. मध्यरात्री १२ च्या सुमारास गोठ्याला अचानक आग लागली. काही कळण्याच्‍या आतच आगीने रौद्ररुप धारण करत अवघा गोठा कवेत घेतला. घटनास्‍थळाचा पंचनामा तलाठ्यांनी केला आहे. शेतकरी काळे यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी ग्रामस्‍थांनी केली आहे.