केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कऱ्हाड आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आज बुलडाण्यात! वंजारी समाज मेळाव्याला करणार संबोधित; गुणवंतांचा सत्कारही करणार! बातमीत वाचा कसे आहे नियोजन..

 
jyhy
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कऱ्हाड आणि महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आज, ८ नोव्हेंबरला बुलडाणा जिल्ह्यात येत आहे. बुलडाणा शहरातील गर्दे सभागृहात होणाऱ्या वंजारी समाज मेळाव्याला ते संबोधित करणार असून समाजातील गुणवंताचा सत्कारही त्यांच्या हस्ते होणार आहे.

       bbbb

                        ( जाहिरात👆🏻 )

 mundhe

             ( जाहिरात👆🏻 )

दुपारी १ वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे.  विदर्भ वंजारी समाज सेवा परिषदेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  आमदार संतोष बांगर, आमदार सुहास कांदे, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार संजय दौंड, महासावंगी संस्थांनच्या महंत राधाताई सानप, महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल चे सदस्य  ॲड.अविनाश आव्हाड, ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष गोपीनाथ वाघ यांची सुद्धा या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे. या मेळाव्याला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ वंजारी समाजसेवा परिषदेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र वाघ, उपाध्यक्ष मधुकर जायभाये, सहसचिव पंजाबराव इलग, सरकार्यवाह प्रभाकरराव कापकर यांनी केले आहे.