राजूरचे पुरातन शिवालय भाविकांनी गजबजले ! पावसामुळे परीसरातील निसर्ग सौन्दर्य खुलले !!

 
giol
 बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): श्रावणाच्या पहिल्या सोमवारी घाटातील राजूर येथील पुरातन व निसर्गरम्य  शिवालय आबालवृद्ध भाविकांनी गजबजल्याचे दिसून आले.   समाधानकारक पावसामुळे सभोवतालचा बहरलेला परिसर आणि खळखळ वाहणारा नदीचा प्रवाह हजारो डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला

बुलडाणा मलकापूर राज्य मार्गावरील राजूर नजीक निसर्गाच्या कुशीत असलेले हे जागृत शिवालय, मोताळा व बुलडाणा तालुक्यातील भाविकांचे  श्रध्दा स्थान आहे. श्रावणातील सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते. यंदाही सकाळपासूनच भाविक प्रामुख्याने  भाविक महिलांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या.

दमदार पावसामुळे मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या नदीत जलसाठा असल्याने व ठिकठिकाणी छोटे धबधबे असल्याने बालकांनी जलक्रीडेचा आनंद लुटला. आजूबाजूच्या परिसराने जणू काही हिरवा गालिचा पांघराला असा भास होत होता. रस्त्यातील शेतात बहरलेल्या पिकांनी या निसर्ग सोंदर्यात आणखी भर पडली. आज पहिल्या दिवशीच 3 भंडारे असल्याने हजारो  भाविकांनी महाप्रसादाचा  लाभ घेतला.