मिनी ऑलम्पिक फुटबॉल स्पर्धेला उद्यापासून 'कीक!' बुलडाण्याची महिला चमू पोहचली पुण्याला!

 
uyh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याला क्रीडा वैभव लाभलेले आहे. क्रीडा स्पर्धेत महिलाही मागे नाही. पुणे येथे मिनी ओलंपिक फुटबॉल स्पर्धेचे सामने आयोजित करण्यात आली असून यासाठी बुलडाणा जिल्हा फुटबॉल असोसिएशनची महिला चमू पुण्याला पोहोचली आहे.६ ते ९ जानेवारी दरम्यान हे सामने संपन्न होणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ ते १२ जानेवारी दरम्यान वेगवेगळ्या खेळाचे, वेगवेगळ्या ठिकाणी मिनी ओलंपिक क्रीडा 
 स्पर्धा आयोजित केली आहे. फुटबॉल क्रीडा प्रकारासाठी बुलडाणा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या महिला चमुची निवड झाली. ही चमू पुण्यात पोहोचली असून त्यांचा पहिला सामना उद्या सहा जानेवारीला बलाढ्य संघ मुंबईशी होणार आहे.९ जानेवारीला अंतिम सामना होईल. या चमुचे नेतृत्व प्रशिक्षक दिलीप हिवाळे करीत आहेत.

हा सामना जिंकण्यासाठी एस. एस. ठाकरे,एन.आर.वानखडे, मुकेश बाफना,संजय भंडारी, रज्जन श्रीवास, फयाद अहमद शब्बु यांनी शुभेच्छा दिल्या.