मॅक्झिमो वाहनाने मोटारसायकलला उडवले; तरुणाचा मृत्यू, एक गंभीर, लोणार तालुक्यातील घटना

 
243
बिबी, ता. लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव मॅक्झिमो वाहनाने मोटारसायकलला जबर धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या मोटारसायकलस्वार तरुणाचा आज, २२ एप्रिलला सकाळी उपचारादरम्‍यान मृत्यू झाला. काल, २१ मार्चला दुपारी चारला मेहकर- जालना रोडवरील बिबीजवळ रामलखन ढाब्यासमोर हा अपघात झाला होता.
अक्षय राठोड (३५, रा. पिंपरखेड, ता. लोणार) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव असून, त्याच गावचा मनोज राठोड (२५) गंभीर जखमी झाला आहे. दोघे पिंपरखेडवरून बिबीकडे येत होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या मॅक्झिमोने त्‍यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. यात दोघे गंभीर जखमी झाले.  त्यांना तातडीने बिबी येथील संतोष बनकर, बद्री गावंडे, कैलास मोरे यांनी  देऊळगाव राजा येथे हलवले. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जालना येथे हलविण्यात आले. आज सकाळी सहाला उपचारादरम्यान अक्षयचा मृत्यू झाला. वृत्त लिहीपर्यंत बिबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.