ऐतिहासिक जन्मोत्सव..जिजाऊ सृष्टी फुलली! शासनाने ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन करावे - शिवाजी राजे देशमुख

 
hyft
बुलडाणा (प्रशांत खंडारे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अफाट भक्तांचा जनसागर उसळलेला..राजमाता जिजाऊ सृष्टी सजलेली.. राजवाडा विद्युत रोषणाईने उजळून निघालेला.. फटाक्यांची आतिषबाजी.. जिजाऊंच्या जयघोषाने आसमंत निनादलेला..राजमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आतुरलेले जिजाऊ भक्त आणि आस्थेने पहाटेच राजे लखोजी जाधव यांच्या वंशजानी केलेली आरती यावर्षी ऐतिहासिक आणि लक्षवेधी ठरली! दरम्यान शासनाने ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन करावे, अशी अपेक्षा शिवाजी राजे देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.

                         shelke

                                               (जाहिरात👆)

 सिंदखेड राजा येथे आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची ४२५ वी जयंती मोठ्या हर्शोल्हासात साजरी होत आहे.बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात जिजामातेचा जन्म झाला. दरवर्षी हा जन्मोत्सव आनंदात साजरा होतो.

परंतु कोरोनाच्या संक्रमणानंतर २ वर्षांनी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. दरम्यान राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सजविण्यात आले. महिला आणि पुरुष यांनी  भगवे फेटे परिधान करून 'तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय' अशा घोषणा देत सकाळपासूनच जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी तुफान गर्दी केली. पहाटेच राजे लखोजी जाधव यांचे वंशज यांनी राजमाता जिजाऊची आरती करून वंदन करण्यात आले. राजवाडा परिसरामध्ये फटाक्याची आतिश बाजी करत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी खासदार प्रतापराव जाधव,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, जयश्रीताई शेळके व मान्यवर जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी उपस्थित होते.