GOOD NEWS ही बातमी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी! उद्योग सुरू करण्यासाठी मिळेल ५० लाखांचे कर्ज! त्यासाठी "हे" करा..!!

 
paisa
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविल्या जात आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

 जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना १ ऑगस्ट २०१९ पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत १८ ते २५ वयोगटातील  किमान सातवी उत्तीर्ण असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग सुरू करण्यासाठी बँकेमार्फत ५० लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय आहे.

यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग , महिला , माजी सैनिक या प्रवर्गाकरीता वयोमर्यादेत अधिक ५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. या ऑनलाईन योजनेत ग्रामीण आणि शहरी घटकांना १५ टक्के , २५ टक्के, ३५ टक्के अनुदानाची सोय उपलब्ध आहे. या योजनेसोबतच केंद्र शासनाची पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अनुदानीत योजना राबविली जाते. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.