जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो ५ नोव्हेंबर पर्यंत नो टेन्शन! हवामान विभागाचा "हा" सल्ला वाचाच..! हरभरा पेरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची..

 
chana
बुलडाणा(अनंता काशीकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. उभ्या सोयाबीनला कोंब फुटले. कापसाचे मोठे नुकसान झाले. यंदा दिवाळीतही सोयाबीन सोंगण्याचा हंगाम सुरु होता. दरम्यान गेल्या काही दिवसांत पावसाने माघार घेतल्याने शेतकऱ्यांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे.  ५ नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील हवामान कोरडेच राहणार असल्याने हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

आज, १ नोव्हेंबर रोजी वर्तविलेल्या  ५ दिवसीय हवामान अंदाजानुसार पुढील ५ दिवस जिल्ह्यातील हवामान कोरडे राहणार आहे.  दरम्यान तापमानात घट होणार असल्याने थंडीचा कडाका वाढणार आहे.  किमान तापमान १६.५ ते १७.१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कापणी करून मळणी केलेल्या सोयाबीनचा पुढील वर्षी बियाणे म्हणून वापर करायचा असल्यास  सोयाबीनच्या बियाण्यात जास्त ओलावा असल्यास बियाण्याचा थायरम किंवा कार्बनडेन्झिम या बुरशनाशकाची ५० ग्रॅम प्रतिक्विंटल या प्रमाणात बीजप्रकिया करावी असा सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या वतीने देण्यात आला आहे. यासोबतच रब्बी हंगामात हरबरा पिकाची पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी, त्यामुळे बियाणे कमी लागेल व आंतरमशागतीची कामे सोपे होतील असे आवाहनही करण्यात आले आहे.