पोळ्याला ५० खोक्यांचा जलवा! भूमिपुत्रांच्या बालेकिल्ल्यात खऱ्या खुऱ्या भूमिपुत्रांनी बैलाच्या पाठीवर लिहिले "५० खोके एकदम ok..!

 
ok
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल एकदम ओके मधी हाय..! हा आमदार शहाजीबापू पाटलांचा डायलॉग राज्यभर फेमस झाला. त्यानंतर बंडखोर आमदारांनी ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप ठाकरे गट व काँगेस राष्ट्रवादी कडून सातत्याने केला जातो..५० खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी विधानभवनात विरोधी गटांकडून करण्यात आली. आता बैलपोळ्याचा सणानिमित्त सुद्धा ग्रामीण भागात ५० खोक्यांचा ट्रेण्ड दिसून आला.

 पोळ्याला शेतकरी बैल सजवतात, रंगवतात. काही शेतकरी आपला बैल एकदम हटके दिसला पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. काल , पोळ्याला मेहकर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या पाठीवर ५० खोके एकदम ok..!

असे  लिहिण्यात आल्याचे दिसून आले. बंडखोर आमदार, खासदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप पोळ्याच्या या माध्यमातून शेतकऱ्यांनी सुद्धा केला. विशेष म्हणजे तीन वेळा आमदार अन तीन वेळा खासदार राहिलेल्या शिंदे गटात गेलेल्या भूमिपुत्रांच्या बालेकिल्ल्यात "खऱ्या खुऱ्या भूमिपुत्रांनी" मात्र आम्ही तुमच्या सोबत नसल्याचे यानिमित्ताने दाखवून दिले आहे.