सोयगावात जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी ३२ लाखांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन! आमदार श्वेताताई म्हणाल्या, सोयगाव वासियांची गैरसोय दूर करण्यासाठी कटिबद्ध!

 
bgh
धाड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधान सभा मतदार अनेक गावांपैकी सोयगाव हे एक गाव आहे. अनेक कामे झाली पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही सोडविला गेला नाही . त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्ना सोबतच इतर इतर ही प्रश्न मार्गी लावून सोयगावच्या गैरसोयी दूर करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केले. सोयगाव येथील जलजिवन मिशन अंतर्गत १ कोटी ३२ लक्ष रुपये किमतीच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी नागरिकांना संबोधित करताना त्या बोलत होत्या.

३ नोव्हेंबरला चिखली विधान सभा मतदार संघातील  सोयगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत  १.३२कोटी आणि वरूड २.५४ कोटी अशा एकूण ३ कोटी ८६ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजना  कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा आमदर सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. 

यावेळी  भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपुत, भाजपचे  बुलडाणा तालुकाध्यक्ष
सुनिल देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख धनंजय बरोटे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस पंजाबराव धनवे, पंचायत समिती सदस्य संदीप उगले पाटील,सावळीचे सरपंच डॉ. तेजराव नरवाडे,देवेंद्र पातील, अरूण पाटिल, प्रकाश राउत, शरद ताठे ,  भगवान् पिंपळे, राजू पिंपळे, इंद्रनाथ मांन्टे , समाधान आघाव , अनिल बोरडे, सोयगाव सरपंच सौ. सरलाताई मांन्टे, वरूडच्या सरपंच  सौ. शिलाताई बुर्जे , उपसरपंच दिलिप  निकम ,उपसरपंच संदीप पैठने ,उपसरपंच सौ वैशाली पिंपळे, उपसरपंच सौ रंजनाताई पांडव तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य व समस्त गावकरी मंडळी केसापुर, अटकळ, सोयगाव, वरूड येथील ग्रामस्थ उपस्थित होते.