BULDANA LIVE SPECIAL पाणी टंचाईवर १० कोटी खर्ची; मिळाली कवडीही नाही ! दोघांचे'च मंत्रिमंडळ ठरतेय मारक ! पालक' च नसल्याचाही परिणाम

 
paani
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जवळपास एक महिन्यापासून राज्यात असलेले दोघांचेच सरकार अन जिल्ह्याला पालकामंत्रीच  नसल्याचे विकासाची कामे ठप्प असून जिल्ह्याचा कारभार सांभाळणाऱ्या यंत्रणांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे...

यंदा  खूपच लांबलेल्या व २७ जुलैला स्टॉप झालेली पाणी टंचाई याचे एक मजेदार उदाहरण ठरावे. या तारखेला जिल्हयात सुरू असलेली टँकर व अधिग्रहित खाजगी विहिरींची धूम आणि त्याद्वारे लाखावर ग्रामस्थांना सुरू असलेला पाणी पुरवठा थांबला. याशिवाय इतर उपाय योजनाना देखील स्टॉप मिळालाय! आता यातील  ३२ टँकरने करण्यात आलेल्या पाणी पुरवठ्यावर ३ कोटी ४२ लाख तर अधिग्रहित विहिरींवर  सुमारे २ कोटी(१कोटी ९५ लाख रुपये) खर्ची झालेत. विंधन विहिरी वर १६ लाख, नळ योजनांच्या विशेष दुरुस्ती वर १ कोटी ६३ लाख, विंधन विहिरी दुरुस्ती वर ८० लाख तर तात्पुरत्या पूरक नळ पाणी योजनावर सव्वा कोटी खर्ची झाले आहे.

सर्व कामे उधारीवरच!

 मात्र कामे तब्बल १० कोटींची अन ग्रँट मात्र कवडीही नाही अशी मजेदार गत आहे.यामुळे कोट्यवधींची ही कामे उधारीवरच भागविण्यात आली ! मुळात मंत्रिमंडळ दोघांचेच आणि त्यात दोघेजण मंत्रिमंडळ विस्तारवर खलबते, दिल्ली वाऱ्या, हिंदुत्वाचे रक्षण , आमदारांची मनधरणी अश्या महत्वाच्या कामात बिझी  असल्याने त्यांना अश्या किरकोळ कामात लक्ष द्यायला वेळ नाय!  त्यांच्याकडे ओरड करायची तर पालकमंत्रीच नाही अन ५ सत्ताधारी आमदार संधीवर लक्ष ठेवून आणि विरोधी आमदार आंदोलने व बचावाच्या राजकारणात व्यस्त. यामुळे  जिल्ह्याची काळजी वाहणाऱ्यांचीच टंचाई असताना या टंचाईची कोण काळजी घेणार?...