24 तासांत 10 रुग्ण दगावले! बळींची संख्या 532!! आज पावणेसातशे पॉझिटिव्ह

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील मृत्यूचे थैमान सुरूच असून, मागील 24 तासांत तब्बल 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजअखेर बळींची संख्या 532 वर पोहोचली आहे. दुसरीकडे आज 674 कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, मेहकरात पुन्हा कोविडचा स्फोट झाल्यासारखी स्थिती आहे. रुग्णांची संख्या आटोक्यात वाटत असली तरी बळींची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील मृत्यूचे थैमान सुरूच असून, मागील 24 तासांत तब्बल 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजअखेर बळींची संख्या 532 वर पोहोचली आहे. दुसरीकडे आज 674 कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, मेहकरात पुन्हा कोविडचा स्फोट झाल्यासारखी स्थिती आहे.

रुग्णांची संख्या आटोक्यात वाटत असली तरी बळींची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांची धाकधूक वाढणे स्वाभाविक ठरते. दर अडीच तासाला एक मृत्यू असा गत्‌ 24 तासांतील बळींची भीषण सरासरी राहिली. उपचारादरम्यान डिघी (ता. नांदुरा) येथील 80 वर्षीय पुरुष, सातगाव म्हसला (ता. बुलडाणा) येथील 68 वर्षीय पुरुष, मोताळा येथील 40 वर्षीय पुरुष, आदर्श कॉलनी हिंगोली येथील 63 वर्षीय पुरुष, सिव्हिल लाईन खामगाव येथील 68 वर्षीय पुरुष, महाळूंगी (ता. नांदुरा) येथील 33 वर्षीय महिला, नांद्रकोळी ता. बुलडाणा येथील 68 वर्षीय पुरुष, बावनबीर (ता. संग्रामपूर) येथील 50 वर्षीय पुरुष, वॉर्ड क्रमांक 1 मेहकर येथील 65 वर्षीय महिला, मंगरुळ नवघरे (ता. चिखली) 69 वर्षीय महिला  रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर एकूण रुग्णसंख्या 532 वर पोहोचली आहे.

मेहकर दीडशेच्या घरात…

दरम्यान, मेहकरात कोविडचा स्फोट झाल्यासारखी स्थिती असून, तब्बल 148 रुग्ण निघाले. याशिवाय बुलडाणा 98, खामगाव 67, देऊळगाव राजा 59, चिखली 63, नांदुरा, जळगाव जामोद व सिंदखेडराजा प्रत्येकी 43 या तालुक्यातील संख्या लक्षणीय आहे. यातुलनेत शेगाव 38, मलकापूर 21, लोणार 34, मोताळा 9 व संग्रामपूर 8 या तालुक्यांतील आकडे कमी आहेत.

5503 कोरोनाबाधित रुग्‍णांवर उपचार

आज 563 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 431229 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 73909 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.  आज रोजी 3089 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 79944 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या  रुग्णालयात 5503 कोरोनाबाधित रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 532 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

5926 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह

प्रयोगशाळेत तपासणीसाठी  पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 6600 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 5926 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 674 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 373 व रॅपिड टेस्टमधील 301 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 905 तर रॅपिड टेस्टमधील 5021 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 5926 अहवाल निगेटिव्ह आहेत.