Update : आजवर 55 हजार बुलडाणेकरांनी केली कोरोनावर मात! सध्या साडेसहा हजार रुग्‍ण घेताहेत उपचार!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः जिल्ह्यात आजवर 55 हजारहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सध्या साडेसहा हजार रुग्ण उपचार घेत आहेत. आज, 29 एप्रिलला जिल्ह्यात कमी संख्येने कोरोना पॉझिटिव्ह आले. आजची रुग्णसंख्या 620 इतकी आहे. मात्र यामध्येही बुलडाणा व खामगाव तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक व धुमाकूळ कायम असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कोविडने 7 बळी घेतल्याने कमी …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः जिल्ह्यात आजवर 55 हजारहून अधिक रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, सध्या साडेसहा हजार रुग्‍ण उपचार घेत आहेत. आज, 29 एप्रिलला जिल्ह्यात कमी संख्येने कोरोना पॉझिटिव्ह आले. आजची रुग्णसंख्या 620 इतकी आहे. मात्र यामध्येही बुलडाणा व खामगाव तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक व धुमाकूळ कायम असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कोविडने 7 बळी घेतल्याने कमी रुग्णांचा दिलासा नाममात्र ठरलाय!

28 एप्रिलला जिल्ह्यात 662 पॉझिटिव्ह आढळले होते. आज सलग दुसऱ्या दिवशी ( 620 रुग्ण) हा दिलासा कायम राहिला. मात्र कोरोना बुलडाणा (173) व खामगाव (118) या आघाडीवरील तालुक्यांना कोणताही दिलासा द्यायला तयार नाय! या तुलनेत लोणार 80 रुग्ण, नांदुरा 57, चिखली 40, मेहकर 40, सिंदखेडराजा 27, देऊळगाव राजा व मलकापूर प्रत्येकी 22, मोताळा 19 या तालुक्यांतील कोरोनाची तीव्रता कमी झाली असे किमान आज तरी सांगता येते. शेगाव तालुक्यातील पॉझिटिव्ह (2) संग्रामपूर (5 रुग्ण) पेक्षा कमी आहे ही बातमी मागची बातमी की मजेदार बातमी याचा फैसला ज्याने त्याने करावा असे म्हणता येईल.

प्राप्त 4132 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4834 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4132 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 620 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 297 व रॅपीड टेस्टमधील 323 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 609 तर रॅपिड टेस्टमधील 3523 अहवालांचा समावेश आहे.

असे आहेत बळी…

दुर्गानगर, नांदुरा येथील 65 वर्षीय पुरुष, देऊळगाव घाट (ता. बुलडाणा) येथील 47 वर्षीय महिला, जाळीचा देव ता. भोकरदन येथील 50 वर्षीय महिला, सिंदखेड राजा येथील 65 वर्षीय महिला, खैरव ता. देऊळगाव राजा येथील 70 वर्षीय पुरुष, शिवणी पिसा (ता. लोणार) येथील 49 वर्षीय महिला व सैलानी (ता. बुलडाणा) येथील 65 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

6685 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आज 1269 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 352118 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 55580 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 4692 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 62671 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 6685 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 406 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.