“समृद्धी’मुळे शेतीकडे जाणारा रस्‍ताच बंद!; कंत्राटदार आश्वासनाला पलटला, शेतकऱ्यांची तक्रार, खरीप कामे थांबल्याने घेतला “हा’ पवित्रा!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः समृद्धी महामार्गामुळे बंद झालेला पांदण व बैलगाडी वहीवाटीचा रस्ता खुला करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पळसखेड (मलकदेव ) ते सिंदखेड राजा येणारी व जाणारी, पळसखेड म. ते नसीराबाद बैलगाडीचा वहीवाटीचा रस्ता बंद झाला आहे. पळसखेड येथील शेतकरी गजानन पाडुरंग भुतेकर, श्रीहरी …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः समृद्धी महामार्गामुळे बंद झालेला पांदण व बैलगाडी वहीवाटीचा रस्‍ता खुला करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील पळसखेड (मलकदेव ) ते सिंदखेड राजा येणारी व जाणारी, पळसखेड म. ते नसीराबाद बैलगाडीचा वहीवाटीचा रस्ता बंद झाला आहे.

पळसखेड येथील शेतकरी गजानन पाडुरंग भुतेकर, श्रीहरी पांडुरंग भुतेकर, दामोधर भाऊराव भुतेकर व अन्य शेतकऱ्यांची शेते समृद्धी महामार्गाच्या पलिकडे आहेत. त्यामुळे त्यांना शेतात जाण्या येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. सध्या खरिप हंगामाचे दिवस आहेत. शेतात जाण्यासाठी रस्ता आवश्यक असतो. मात्र महामार्गाच्या ठेकेदाराने आश्वासन दिल्याप्रमाणे पांदण रस्ता व बैल गाडी रस्ता खुला करून दिला नाही. त्‍यामुळे शेतातील डव्हरणी, कोळपणीची कामे थांबली आहेत. खरीप हंगामातील कामे कशी करायवी, असा सवाल शेतकऱ्यांनी केली आहे. सात दिवसांत दोन्ही रस्ते खुले करू द्यावे अन्यथा तहसील कार्यालयासमोर सर्व गावकरी उपोषणाला बसतील, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देताना जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे, गजानन भुतेकर , दामोधर भुतेकर, श्रीहरी भुतेकर व इतर गावकरी उपस्थित होते.