“राष्ट्रवादी’च्‍या खामगाव तालुकाध्यक्षाविरोधात बुलडाण्यात उपोषण; भरत लाहुडकारविरुद्ध दाखल गुन्ह्यांचे लावले बॅनर!; कुटुंबावर केला होता सशस्‍त्र हल्ला, साडेचार महिन्यांनंतरही मुख्य आरोपी मोकाट!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कुटुंबावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी व राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष भरत विश्वासराव लाहुडकार याला आजपर्यंत पोलीस अटक करू शकले नाहीत. यापूर्वीही लाहूडकारविरुद्ध गंभीर स्वरुपाचे आठ गुन्हे दाखल आहेत. तरीही पोलीस त्याला अटक का करत नाहीत, असा सवाल करत हल्ल्यातील जखमींचे नातेवाइक नितीन गजानन लाहूडकार आणि संजय हरिभाऊ लाहूडकार यांनी जिल्हा …
 
“राष्ट्रवादी’च्‍या खामगाव तालुकाध्यक्षाविरोधात बुलडाण्यात उपोषण; भरत लाहुडकारविरुद्ध दाखल गुन्ह्यांचे लावले बॅनर!; कुटुंबावर केला होता सशस्‍त्र हल्ला, साडेचार महिन्यांनंतरही मुख्य आरोपी मोकाट!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कुटुंबावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी व राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष भरत विश्वासराव लाहुडकार याला आजपर्यंत पोलीस अटक करू शकले नाहीत. यापूर्वीही लाहूडकारविरुद्ध गंभीर स्वरुपाचे आठ गुन्‍हे दाखल आहेत. तरीही पोलीस त्‍याला अटक का करत नाहीत, असा सवाल करत हल्ल्यातील जखमींचे नातेवाइक नितीन गजानन लाहूडकार आणि संजय हरिभाऊ लाहूडकार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आज, २८ ऑगस्‍टला दुपारी १ च्‍या सुमारास उपोषण सुरू केले आहे.

भरत लाहूडकारविरुद्ध दाखल गुन्ह्यांचे बॅनरच उपोषणस्‍थळी लावले आहेत. आरोपीला कायद्याची भीती राहिली नाही. आमच्‍या कुटुंबावर जीवघेणा सशस्‍त्र होऊन साडेचार महिने झाले आहेत, तरीही आरोपीला अद्याप अटक नाही. हल्ल्यातील गंभीर जखमी गजानन लाहूडकार दवाखान्यात मृत्‍यूशी झुंज देत आहेत. पोलीस जोपर्यंत भरत लाहूडकारला शोधून अटक करत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार नितीन लाहूडकार आणि संजय लाहूडकार यांनी व्‍यक्‍त केला आहे.