सुखद ब्रेकिंग! दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत राहणार सुरू!! सिनेमागृह, नाट्यगृह, धार्मिक स्थळे बंदच

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागील आठवड्यापासून व्यापार, उद्योग जगताला असलेली प्रतीक्षा आता संपली आहे! राज्यातील 15 जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांसाठी गुड न्यूज देणारे राज्य शासनाचे निर्देश अखेर आज प्राप्त झाले. यामुळे बुलडाण्यासह अन्य जिल्ह्यातील व्यापार उदीम व दैनंदिन व्यवहार, उलाढाल पूर्ववत सुरळीत होण्याची सुखद चिन्हे आहेत. उद्या, ३ ऑगस्टला जिल्हा प्रशासनाकडून …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागील आठवड्यापासून व्यापार, उद्योग जगताला असलेली प्रतीक्षा आता संपली आहे! राज्यातील 15 जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांसाठी गुड न्यूज देणारे राज्य शासनाचे निर्देश अखेर आज प्राप्त झाले. यामुळे बुलडाण्यासह अन्य जिल्ह्यातील व्यापार उदीम व दैनंदिन व्यवहार, उलाढाल पूर्ववत सुरळीत होण्याची सुखद चिन्हे आहेत. उद्या, ३ ऑगस्‍टला जिल्हा प्रशासनाकडून आदेश निघण्याची दाट शक्यता असून, सुमारे 28 लाख जिल्हा वासीयांची त्याची आतुर प्रतीक्षा लागली आहे.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज 2 ऑगस्ट रोजी हे निर्देश जारी केले. त्याचे विश्लेषण केले असता, किरकोळ अपवाद वगळता आता खऱ्या अर्थाने बुलडाणा जिल्ह्यातील मार्केट ओपन होणार आहे. अत्यावश्यक वस्तूसह अन्य दुकाने व शॉपिंग मॉल्स सोमवार ते शुक्रवारी रात्री 8, शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा राहणार आहे. रविवारी मात्र जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच उघडी राहतील. सार्वजनिक उद्याने, क्रीडांगणे, वॉकिंग, जॉगिंग व सायकलिंगसाठी खुली राहतील. शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू ठेवता येईल. सलून, जिम, ब्युटीपार्लर व योगा केंद्र याच वेळेत सुरू राहतील. मात्र ती 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवावी लागतील. शनिवारी दुपारी 3 ही मर्यादा तर रविवारी मात्र ती बंद ठेवावी लागणार आहे. उपहारगृहे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह आणि नंतर पार्सल सेवा अशा पद्धतीने सुरू ठेवता येईल. मात्र सिने, नाट्यगृहे व मल्टिप्लेक्स, धार्मिक स्थळे मात्र बंदच राहणार आहेत. रात्री 8 ते पहाटे 5 वाजेदरम्यान संचारबंदी लागू असण्याची शक्यता आहे.