सरपंच, उपसरपंच दारू विकणाऱ्यांचे फोटो घेऊनच आले पोलीस ठाण्यात!; चिखली येथील प्रकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गावपरिसरात अवैध दारूविक्री जोरात सुरू असून, या प्रकारांना आळा घालण्यासाठी गोद्री (ता. चिखली) येथील नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी चिखली पोलीस ठाण्यात ठाणेदारांची भेट घेतली. यावेळी दारू विकणाऱ्यांचे दारू विकतानाचे फोटो व व्हिडिओदेखील ठाणेदारांना देण्यात आले. गोद्री, चांधईतील अवैध दारूविक्रीला आळा घालावा. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गावपरिसरात अवैध दारूविक्री जोरात सुरू असून, या प्रकारांना आळा घालण्यासाठी गोद्री (ता. चिखली) येथील नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी चिखली पोलीस ठाण्यात ठाणेदारांची भेट घेतली. यावेळी दारू विकणाऱ्यांचे दारू विकतानाचे फोटो व व्हिडिओदेखील ठाणेदारांना देण्यात आले.

गोद्री, चांधईतील अवैध दारूविक्रीला आळा घालावा. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्‍यांनी ठाणेदाराकडे केली. दारू पिणारे सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात. अर्वाच्‍च भाषेत शिवीगाळ करतात. त्यामुळे रस्त्याने ये जा करणाऱ्यांना महिला, मुली व विद्यार्थ्यांना त्रास होतो. कामगार व युवक दारूच्या व्यसनात गुरफटल्याने अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त होत आहेत, असेही ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सरपंच सखुबाई दहिकर, उपसरपंच भारत जोगदंडे ,पोलीस पाटील राहुल साळवे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.