शेतकऱ्यांनो, जुन्या दरानेच खत घ्या!; वाचा कोणत्या खतासाठी किती मोजायचे पैसे…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून येणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. एप्रिल 2021 पासून युरिया वगळता इतर रासायनिक खतांची दरवाढ खत उत्पादक कंपन्यांनी केली होती. केंद्र शासनाने 20 मे 2021 च्या निर्देशानुसार या कंपन्यांना वाढीव किंमतीसाठी अनुदान देण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे खत विक्रेत्या दुकानदारांनी खते जुन्याच दराने …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून येणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. एप्रिल 2021 पासून युरिया वगळता इतर रासायनिक खतांची दरवाढ खत उत्पादक कंपन्यांनी केली होती. केंद्र शासनाने 20 मे 2021 च्या निर्देशानुसार या कंपन्यांना वाढीव किंमतीसाठी अनुदान देण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे खत विक्रेत्‍या दुकानदारांनी खते जुन्याच दराने विक्री करावयाची आहेत. तरीही काही खत विक्रेते वाढीव दराप्रमाणेच छापील किंमतीवर खते विक्री करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते.

ज्या खत विक्रेत्यांकडे वाढीव दरातील खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यांनी सुधारित दराप्रमाणेच खते विक्री करावी. शेतकऱ्यांनी सुद्धा सुधारित दरांप्रमाणेच खते खरेदी करावी. सुधारित दरांपेक्षा वाढीव दराने खतांची विक्री होत असल्यास किंवा तसे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी, पंचायत समितीचे कृषि अधिकारी किंवा जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा कक्षातील अरुण इंगळे यांच्या 7588619505 आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक व मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद बुलडाणा येथील विजय खोंदील यांच्या 7588041008 मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन खते परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.

असे आहेत रासायनिक खत कंपनीचे सुधारित विक्री दर (प्रति बॅग 50 किलो)

खताचा प्रकार ग्रेड : डिएपी – इफ्फको 1200 रुपये, जीएसएफसी 1200 रुपये, जय किसान 1200 रुपये, कोरोमंडल 1200 रुपये, महाधन 1200 रुपये, कृभको 1200 रुपये, 10:26:26 – इफ्फको 1175 रुपये, जीएसएफसी 1175 रुपये, जय किसान 1375 रुपये, कोरोमंडल 1300 रुपये, महाधन 1390 रुपये, कृभको 1300 रुपये, 12:32:16 – इफ्फको 1185 रुपये, जीएसएफसी 1185 रुपये, जय किसान 1310 रुपये, महाधन 1370 रुपये, कृभको 1310 रुपये, 20:20:0:13 – इफ्फको 975 रुपये, जय किसान 1090 रुपये, कोरोमंडल 1050 रुपये, आरसीएफ 975 रुपये, महाधन 1150 रुपये, कृभको 1050 रुपये, 19:19:19 – जय किसान 1575 रुपये. 28:28:00 – जय किसान 1475 रुपये, कोरोमंडल 1450 रुपये, 14:35:14 – जय किसान 1365 रुपये, कोरोमंडल 1400 रुपये, 24:24:0:85 – कोरोमंडल 1500 रुपये, महाधन 1450 रुपये, 15:15:15:09 – कोरोमंडल 1150 रुपये, 16:20:0:13 – कोरोमंडल 1000 रुपये, 15:15:15 – आरसीएफ 1060 रुपये, 14:28:00 – महाधन 1280 रुपये, 16:16:16 – महाधन 1125 रुपये, MOP – कृभको 850 रुपये.