लोणारमध्ये वरुण राजाची सटकली! 24 तासांतच 113 मि.मी. पाऊस!! अन्य 8 तालुक्यांतही दमदार पाऊस; खरीप पिकांना जीवदान

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः मागील काही दिवसांच्या ब्रेकनंतर पावसाने गत् 24 तासांत जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली असून, लोणारमध्ये “अति अति’ वृष्टीची म्हणजे तब्बल 113.4 मिलिमीटर इतक्या दणदणीत पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय आणखी 8 तालुक्यांतही पावसाने दमदार हजेरी लावल्याने लाखो हेक्टरवरील खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मध्यंतरी पावसाने काही दिवस ओढ दिल्याने लाखो हेक्टरवरील पिकांची …
 
लोणारमध्ये वरुण राजाची सटकली! 24 तासांतच 113 मि.मी. पाऊस!! अन्य 8 तालुक्यांतही दमदार पाऊस; खरीप पिकांना जीवदान

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः मागील काही दिवसांच्या ब्रेकनंतर पावसाने गत्‌ 24 तासांत जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली असून, लोणारमध्ये “अति अति’ वृष्टीची म्हणजे तब्बल 113.4 मिलिमीटर इतक्या दणदणीत पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय आणखी 8 तालुक्यांतही पावसाने दमदार हजेरी लावल्याने लाखो हेक्टरवरील खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.

मध्यंतरी पावसाने काही दिवस ओढ दिल्याने लाखो हेक्टरवरील पिकांची स्थिती बिकट झाली होती. मात्र पावसाने पुन्हा पुनरागमन केल्याचे सुखद चित्र आहे. मागील 24 तासांत जिल्ह्यात तब्बल 426 मि.मी. तर सरासरी 33 मि.मी. पावसाने हजेरी लावली. लोणार तालुक्याला पावसाने गत्‌ 24 तासांत झोडपून काढले. यादरम्यान तब्बल 113.4 मिलिमीटर पावसाने आता माझी सटकली या धर्तीवर कोसळधार हजेरी लावली! याशिवाय बुलडाणा 34.7 मि.मी., चिखली 38.8 मि.मी., मेहकर 32, खामगाव 37.5, मलकापूर 36,नांदुरा 29.8, मोताळा 29.7 तर शेगाव तालुक्‍यात 24 मि.मी. पाऊस झाला. या तुलनेत संग्रामपूर 10.8 मि.मी., जळगाव 11.5 मि.मी., देऊळगावराजा 13.8 मि.मी., सिंदखेडराजा 14 मि.मी. या तालुक्यात पावसाने नाममात्र हजेरी लावली असे म्हणता येईल.

(छायाचित्र ः राजेश कोल्हे, देऊळगाव राजा)