लग्नात नियमांच्‍या उल्लंघनासाठी आता 50 हजारांचा दंड! मंगल कार्यालय करणार सील!! ऑप्टिकल्स, आधार- आपले सरकार केंद्र, सीए कार्यालयांना संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मुभा; अत्यावश्यक सह पेट्रोलपंपांची वेळ सकाळी 7 ते 11

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य शासनाचे निर्देश लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध आता 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू केले आहेत. आज, 30 एप्रिलला संध्याकाळी यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या आदेशात पूर्वीच्याच वेळा कायम ठेवण्यात आल्या आहे. मात्र काही आवश्यक आस्थापनांना सवलत देण्यात आली आहे. आजवर वेळोवेळी लागू आदेशनंतरही कोरोनाचा …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्य शासनाचे निर्देश लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध आता 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू केले आहेत. आज, 30 एप्रिलला संध्याकाळी यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या आदेशात पूर्वीच्याच वेळा कायम ठेवण्यात आल्या आहे. मात्र काही आवश्यक आस्थापनांना सवलत देण्यात आली आहे.

आजवर वेळोवेळी लागू आदेशनंतरही कोरोनाचा प्रकोप कमी झाला नाहीये. यामुळे मागील आदेशाने 1 मेपर्यंत लागू केलेले कडक निर्बंध आता 15 मेपर्यंत लागू राहणार आहे. लग्‍न समारंभांसाठीचे निर्देश आणखी कडक करण्यात आले आहेत. लग्नात 25 जणांना परवानगी आणि 2 तासांचा कालावधी हे नियम कायम असले तरी त्याचे उल्लंघन केल्यास तब्बल 50 हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच मंगल कार्यालय कोविड प्रकोप कमी होइपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. खासगी वाहतूक अत्यावश्यक कामासाठी सुरू राहील. मात्र त्यांना सोबत वैद्यकीय कागदपत्रे बाळगणे बंधनकारक आहे. दुसरीकडे काही अत्यावश्यक आस्थापनांना वेळ वाढवून देण्यात आली आहे. यामध्ये आधार केंद्र, आपले सरकार केंद्र, चार्टर्ड अकौंटट, ऑप्टिकल्स यांच्यासाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 8 अशी वेळ ठरवून देण्यात आली आहे. किराणा, डेअरी, भाजीपाला, फळे, मटण- चिकन- मासे विक्री, कृषी संबंधित दुकाने, पशु खाद्य व्यवसाय व पावसाच्या हंगामासाठी  साहित्य तयार करणारे उत्पादक यांची दुकाने सकाळी 7 ते 11 दरम्यानच सुरू राहतील. मात्र त्यांना सकाळी 7 ते रात्री 8 दरम्यान होम डिलिव्हरी (घरपोच सेवा) देता येणार आहे. शहर व गावातील पेट्रोलपंप सकाळी 7 ते 11 दरम्यानच सुरू राहणार आहे. हायवेवरील पंप मात्र 24 तास सुरू राहतील. आरोग्य, पोलीस, पाणी पुरवठा, पालिका आदी कार्यालये वगळता इतर कार्यालये, विमा कार्यालय, एटीएम, बँक यांची वेळ  सकाळी 10 ते दुपारी 2 अशी आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयांत 15 टक्के उपस्थिती असेल.