राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिवस 10 जुलैला

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्र शासनाने 10 जुलै हा दिवस राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिवस म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार 10 जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी कोविड 19 नियमांचे पालन करून मच्छिमार बांधवांच्या मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसाय विभागाची सामाजिक बांधिलकी लक्षात घेता, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, मत्स्यव्यावसायिक, मत्स्यशेतकरी, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः केंद्र शासनाने 10 जुलै हा दिवस राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिवस म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार 10 जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी कोविड 19 नियमांचे पालन करून मच्छिमार बांधवांच्या मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसाय विभागाची सामाजिक बांधिलकी लक्षात घेता, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, मत्स्यव्यावसायिक, मत्स्यशेतकरी, मत्स्यकास्तकार यांचे आशा, अपेक्षा व त्यासाठीची शासनाची बांधिलकी व शासनाचे मत्स्यव्यवसायाबाबतचे धोरण मच्छिमार बांधवापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीकोनातून या दिवसाचे अयोजन करण्यात येत आहे, असे सहायक आयुक्त स. इ नायकवडी यांनी कळविले आहे.