रायपूर पोलिसांच्या सोयीसाठी आमदार श्‍वेताताई महाले यांचे गृहमंत्र्यांना साकडे!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली विधानसभा मतदार संघातील रायपूर (ता. बुलडाणा) येथील पोलीस स्टेशनला स्वतंत्र इमारत नसल्याने पोलीस स्टेशनचा कारभार आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमधून सुरू आहे. पोलीस कर्मचार्यांसाठी निवासस्थान नसल्याने पोलीस बांधवांना तिथे राहणे अडचणीचे ठरत आहे. रायपूर पोलीस स्टेशन तसेच कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून बांधकामासाठी प्रस्ताव मागविण्याची मागणी …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली विधानसभा मतदार संघातील रायपूर (ता. बुलडाणा) येथील पोलीस स्टेशनला स्वतंत्र इमारत नसल्याने पोलीस स्टेशनचा कारभार आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमधून सुरू आहे. पोलीस कर्मचार्‍यांसाठी निवासस्थान नसल्याने पोलीस बांधवांना तिथे राहणे अडचणीचे ठरत आहे. रायपूर पोलीस स्टेशन तसेच कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून बांधकामासाठी प्रस्ताव मागविण्याची मागणी आमदार सौ.श्‍वेताताई महाले यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. या प्रश्‍नी विधान भवनात आमदार सौ. श्‍वेताताई महाले यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. पत्रात म्हटले आहे, की रायपूर येथे 1 मे 2008 पासून स्वतंत्र पोलीस स्टेशन म्हणून स्थापना झाली आहे. परंतु रायपूर अती संवेदनशील असल्याने 1912 पासून चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत ब्रिटीश काळापासून स्वतंत्र पोलीस चौकी अस्तित्वात आहे. रायपूर गावाला लागूनच सैलानी बाबांचे जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी दरवर्षी फार मोठी यात्रा भरत असते. दर अमावस्या व पौर्णिमेला हजारो लोक दर्शनासाठी येत असतात. रायपूर येथे 1912 पासून पोलीस चौकी कार्यरत असताना आणि 1 मे 2008 पासून स्वतंत्र पोलीस स्टेशनला मान्यता मिळालेली असताना पोलीस स्टेशनच्या दैनंदिन कामकाजासाठी इमारत नसल्याने रायपूर पोलीस स्टेशनचे काम रायपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये सुरू आहे. त्यामुळे पोलीस स्टेशन तथा आरोग्य यंत्रणा या दोन्ही विभागांतील कर्मचार्‍यांना काम करणे अडचणीचे होत आहे. 20 गुंठे जागा उपलब्ध आहे. परंतु पोलीस स्टेशन इमारत आणि कर्मचारी निवासस्थानासाठी निधी उपलब्ध नसल्याने आतापर्यंत स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात आलेले नाही, असेही पत्रात म्हटले आहे.