म्‍हणायला माजी उपसरपंच, वागणूक ऐकाल तर थक्‍क व्‍हाल…; वृद्ध आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : म्हणायला माजी उपसरपंच, पण वागणूक म्हणाल तर तुमचाही संताप होईल… त्याने स्वतःच्या वृद्ध आई- वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढल्याचा प्रकार समोर आला आहे. उभ्या आयुष्यात कधीही कलेक्टर व एसपी ऑफिस न बघितलेल्या या दाम्पत्याने म्हातारपणात जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आहे. मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील परशराम भालके (८०) व गीताबाई …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : म्‍हणायला माजी उपसरपंच, पण वागणूक म्‍हणाल तर तुमचाही संताप होईल… त्‍याने स्वतःच्या वृद्ध आई- वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढल्‍याचा प्रकार समोर आला आहे. उभ्या आयुष्यात कधीही कलेक्टर व एसपी ऑफिस न बघितलेल्या या दाम्पत्याने म्‍हातारपणात जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आहे.

मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील परशराम भालके (८०) व गीताबाई फालके या वृद्ध दाम्पत्याने काल जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतःच्या मुलाची तक्रार दिली आहे. मुलगा मारहाण करतो. घराबाहेर काढतो. एवढंच काय तर कुण्या नातेवाइकाकडेही जाऊ देत नाही. त्यामुळे पोटच्या मुलाकडून होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात फालके दाम्पत्याने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्‍यांना दोन मुले असून, लहाना मुलगा बाहेरगावी राहतो. शेती व घर आईवडिलांच्या नावावर असताना त्यांच्या मोठ्या मुलाने आई- वडिलांची खोटी सही घेऊन बँकेतून कर्ज काढले. लहान भाऊ बाहेरगावरून आला तेव्हा त्यालाही बेदम मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे.