मेहकर ः बंजारा बांधवांचा तीज उत्सव उत्‍साहात; ११ दिवस चालला उत्‍सह

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील वरवंड तांडा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तीज उत्सव साजरा करण्यात आला. ११ दिवस संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून बंजारा समाजाने आपली संस्कृती, वेशभूषा आणि परंपरा जपली.रक्षाबंधनच्या दिवशी तीज विसर्जनाचा कार्यक्रम वाल्मीकेश्वर संस्थान वरवंड येथे करण्यात आले. कार्यक्रमाला तांड्याचे नायक कारभारी आणि पूर्ण बंजारा समाज उपस्थित …
 
मेहकर ः बंजारा बांधवांचा तीज उत्सव उत्‍साहात; ११ दिवस चालला उत्‍सह

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील वरवंड तांडा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तीज उत्सव साजरा करण्यात आला. ११ दिवस संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून बंजारा समाजाने आपली संस्कृती, वेशभूषा आणि परंपरा जपली.
रक्षाबंधनच्या दिवशी तीज विसर्जनाचा कार्यक्रम वाल्मीकेश्वर संस्थान वरवंड येथे करण्यात आले. कार्यक्रमाला तांड्याचे नायक कारभारी आणि पूर्ण बंजारा समाज उपस्थित होते. यात तांड्याचे नायक प्रल्हाद निंबा राठोड, हजारी राठोड, कारभारी दिलीप राठोड, अमर राठोड, गोर सेना तालुकाध्यक्ष गजानन राठोड, वसंत राठोड, विनोद राठोड, मंगेश राठोड, दीपक चव्हाण, रवींद्र जाधव आदी हजर होते.