मृत्यूचे थैमान कायम; सहाशेकडे वाटचाल! पॉझिटिव्ह रुग्‍णांत लक्षणीय घट!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना जिल्ह्याला पूर्ण दिलासा द्यायला तयारच नाय! पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्यात लक्षणीय घट झाली असतानाच मृत्यूचे थैमान कायमच आहे. बळीचे आकडे सहाशेकडे वेगाने वाटचाल करत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कायम असल्याचे चित्र आहे. मागील तीन दिवसांपासून रुग्णसंख्या पाचशेच्या खाली येत आहे. आज ती आणखी खाली जात 338 पर्यंत …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना जिल्ह्याला पूर्ण दिलासा द्यायला तयारच नाय! पॉझिटिव्ह रुग्‍णांच्या आकड्यात लक्षणीय घट झाली असतानाच मृत्यूचे थैमान कायमच आहे. बळीचे आकडे सहाशेकडे वेगाने वाटचाल करत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कायम असल्याचे चित्र आहे.

मागील तीन दिवसांपासून रुग्णसंख्या पाचशेच्या खाली येत आहे. आज ती आणखी खाली जात 338 पर्यंत पोहोचली आहे. बुलडाणा 66, खामगाव 32, शेगाव 44, देऊळगाव राजा 50, मोताळा 33 वगळता अन्य तालुक्यांतील बधितांची संख्या कमीच आहे. चिखली 24, मेहकर 10, मलकापूर 17, नांदुरा 9, लोणार 10, जळगाव जामोद 14, संग्रामपूर 6 असे रुग्‍णांचे आकडे आहेत.

589 जण दगावले

दरम्यान, गत्‌ 24 तासांत 9 जण दगावले. बुलडाण्याच्‍या महिला रुग्णालयात मृत्यूची संख्या आजही गंभीर म्हणजे 7 इतकी आहे. बुलडाण्यातीलच लद्धड हॉस्पिटल व खामगावच्‍या सामान्य  रुग्णालयात प्रत्येकी एक रुग्ण उपचादरम्यान दगावला. आजअखेर बळींची संख्या 589 पर्यंत पोहोचली आहे. रोजची सरासरी पाहता लवकरच हा आकडा सहाशेच्या घरात पोहोचणार अशी दाट शक्यता आहे.