महाबिजच्‍या बियाण्यासाठी शेतकऱ्यांची बुलडाण्यात लागली 1 किमीची रांग!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी धावपळ सुरू झाली आहे. कंपन्यांपेक्षा महाबिजचे बियाणे परवडणारे असल्याने काल, 2 जूनला बुलडाण्यातील महाबिजच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. जवळपास एक किलोमीटरची रांग लागल्याचे चित्र दिसले. त्यातच बियाणे कमी असल्याची चर्चा सुरू झाल्याने गोंधळ वाढला. अखेर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी तिथे येऊन बियाणे मुबलक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी धावपळ सुरू झाली आहे. कंपन्यांपेक्षा महाबिजचे बियाणे परवडणारे असल्याने काल, 2 जूनला बुलडाण्यातील महाबिजच्‍या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. जवळपास एक किलोमीटरची रांग लागल्याचे चित्र दिसले. त्‍यातच बियाणे कमी असल्याची चर्चा सुरू झाल्‍याने गोंधळ वाढला. अखेर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी तिथे येऊन बियाणे मुबलक असल्याचे सांगत सर्वांना वाटप केले जाईल, असे आश्वासन दिले. त्‍यामुळे शेतकरी शांत झाले.

अगोदर नियोजन का नाही?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कालच्‍या गोंधळाबद्दल सरकारला धारेवर धरले असून, कोरोनाच्‍या परिस्‍थितीत सरकारने बियाण्यांचे अगोदरच नियोजन करायला हवे. नियोजनाअभावी गोंधळ झाला. तत्‍काळ शेतकऱ्यांना बियाणे उपलब्‍ध करून देऊन वाटप करावे अन्यथा रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा त्‍यांनी दिला.