महात्मा फुले जन आरोग्य योजना… जिल्ह्यात ११२६ रुग्णांना मिळाली उपचाराची ‘संजीवनी’

योजनेविषयी तक्रार असल्यास १५५३८८ व १८००२३३२२०० क्रमांकावर संपर्क साधावा बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जिल्ह्यात राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबईमार्फत राबविण्यात येते. या योजनेत जिल्ह्यात मेहकर मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल मेहकर, मेहेत्रे हॉस्पिटल बुलडाणा, सिटी हॉस्पिटल बुलडाणा, संचेती हृदयालय हॉस्पिटल बुलडाणा, तुळजाई हॉस्पिटल चिखली, साई बालरुग्णालय बुलडाणा आदी खासगी कोविड रुग्णालयांचा समावेश …
 

योजनेविषयी तक्रार असल्यास १५५३८८ व १८००२३३२२०० क्रमांकावर संपर्क साधावा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जिल्ह्यात राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबईमार्फत राबविण्यात येते. या योजनेत जिल्ह्यात मेहकर मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल मेहकर, मेहेत्रे हॉस्पिटल बुलडाणा, सिटी हॉस्पिटल बुलडाणा, संचेती हृदयालय हॉस्पिटल बुलडाणा, तुळजाई हॉस्पिटल चिखली, साई बालरुग्णालय बुलडाणा आदी खासगी कोविड रुग्णालयांचा समावेश आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय बुलडाणा, सामान्य रुग्णालय खामगाव, उपजिल्हा रुग्णालय शेगाव, उप जिल्हा रुग्णालय मलकापूर, ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा, ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा अशा एकूण १२ कोविड रुग्णालयात योजनेतअंतर्गत उपचार होतात. या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२० ते ३१ मे २०२१ पर्यंत जिल्ह्यातील १२ रुग्णालयांत एकूण ११२६ रुग्णांनी या योजनेतून उपचार घेतल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

४१६ रुग्णांनी श्वसन विकाराकरिता योजनेअंतर्गत बाहेर जिल्ह्यातदेखील उपचार घेतला आहे. योजने अंतर्गत रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा खर्च योजनेच्या पॅकेजमध्ये समाविष्ट नाही. तो खर्च रुग्णास करावा लागेल. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तक्रार नोंदणी व मदत म्हणून टोल फ्री नंबर १५५३८८ आणि १८००२३३२२०० वर संपर्क साधावा. तसेच ई-मेल वर तक्रार नोंदणीसाठी complaints.healthcharges@jeevandayee.gov.in या ईमेलचा उपयोग करावा. योजने अंतर्गत नॉन कोविड आजारांवर देखील उपचार करण्यात येतात. ही रुग्णालये अशी ः अमृत हृदयालय बुलडाणा, चोपडे हॉस्पिटल मलकापूर, कोलते हॉस्पिटल मलकापूर, मानस हॉस्पिटल मलकापूर, आस्था हॉस्पिटल मलकापूर, सोनटक्के बाल रुग्णालय खामगाव, माउली डायलिसिस सेंटर शेगाव, राठोड हॉस्पिटल मेहकर, धनवे बाल रुग्णालय चिखली, कोठारी हॉस्पिटल चिखली, सिल्व्हर सिटी खामगाव. तसेच केवळ डायलिसिस रुग्णांकरिता सुविधा ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद व ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल (ता. संग्रामपूर) येथे आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.