भूजलाशयीन मच्छिमारी सहकारी संस्था, मत्स्यकास्तकारांनी मत्स्यबोटुकलीची मागणी नोंदवावी; मस्त्यव्यवसाय विभागाचे आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सन 2021 या आर्थिक वर्षाचा भारतीय प्रमुख कार्प अर्थात कटला, रोहू, मृगळ माशांचा प्रजनन हंगाम जुलै 2021 पासून मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी, ता. मेहकर येथे जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू करणे प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील भूजलाशयीन मच्छिमारी सहकारी संस्था आणि ज्या संस्थांकडे पाटबंधारे विभागाचे तलाव, जलाशय तसेच जिल्हा परिषद विभागाचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सन 2021 या आर्थिक वर्षाचा भारतीय प्रमुख कार्प अर्थात कटला, रोहू, मृगळ माशांचा प्रजनन हंगाम जुलै 2021 पासून मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी, ता. मेहकर येथे जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू करणे प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील भूजलाशयीन मच्छिमारी सहकारी संस्था आणि ज्या संस्थांकडे पाटबंधारे विभागाचे तलाव, जलाशय तसेच जिल्हा परिषद विभागाचे सिंचन, पाझर तलाव मासेमारी ठेक्याने असलेल्या ठेकेदार संस्थांनी त्यांच्याकडील ठेक्याने असलेल्या तलाव, जलाशयात शासन धोरणानुसार अपेक्षित मत्स्यबोटुकली संचयन करावे त्याकरिता सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्याकडे मागणी नोंदवावी.

जिल्ह्यातील मत्स्यकास्तकार, शेततळी लाभधारक शेतकरी, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांनी त्यांचे तलाव, शेततळ्यामध्ये संचयन करण्यासाठी मत्स्यजीरे, अर्धबोटुकली, मत्स्यबोटकली, मत्स्यबीजाची मागणी लेखी स्वरूपात सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), प्रशासकीय इमारत, बस स्थानकासमोर, बुलडाणा यांचेकडे नोंदवावी. तसेच कार्यालयाच्या 07262-242254 क्रमांकावर संपर्क साधून मत्स्यजिरे पुरवठ्याबाबतची माहिती घेऊन पुरवठ्याबाबत वेळ व दिनांक घेण्यात यावा. मत्स्यबीज मागणी नोंदविण्यासाठी इच्छूकांनी सहाय्यक आयुक्त स. ई. नायकवडी यांच्या 9029515539, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी नि.मा साळुंके यांच्या 9860809711, इ. तू. देवकत्ते यांच्या 8856929431 क्रमांकावरही संपर्क साधून माहिती घेऊ शकतात. शासकीय योजनांचा लाभ देते वेळेस अडचण निर्माण झाल्यास किंवा अपात्र ठरल्यास जिल्हा कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची नोंद घेण्यात यावी. अपेक्षित मत्स्यबीज, मत्स्यबोटुकली संचयन तलाव, जलाशयात झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास प्रादेशिक उपायुक्त अमरावती कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार तलाव किंवा जलाशयाचा ठेका रद्द करण्याची कार्यवाही होऊन संस्थेला सहा वर्षांच्‍या कालावधीकरीता शासन धोरणानुसार काळ्या यादीत टाकण्यात येईल. सर्व मच्छीमार संस्था, जिल्हा मच्छिमार सहकारी संस्थांचा संघ, मत्स्यकास्तकार, शेततळीधारक मत्स्यकास्तकार यांनी इष्टतम मस्त्यबीज संयचन आणि अपेक्षीत मस्त्योत्पादन घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त स. ई नायकवडी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

असे आहेत मत्स्यबीजाचे प्रकार व सुधारित दर

  • प्रजाती : प्रमुख कार्प – मत्स्यजीरे, आकार 8 ते 12 मि.मी, दर 1000 रुपये प्रति लाख. बिजाचा प्रकार : मत्स्यबीज, आकार 12 ते 25 मि.मी, दर 125 रुपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : अर्ध बोटुकली, आकार 25 ते 50 मि.मी, दर 250 रुपये प्रति हजार. बोटुकली, आकार 50 मि. मी. पेक्षा जास्त, दर 500 रुपये प्रति हजार. प्रजाती : मृगळ – मत्स्यजीरे, आकार 8 ते 12 मि.मी., दर 800 रुपये प्रति लाख. बिजाचा प्रकार : मत्स्यबीज, आकार 12 ते 25 मि. मी., दर 125 रुपये प्रति हजार. अर्ध बोटुकली, आकार 25 ते 50 मि.मी., दर 250 रुपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : बोटुकली, आकार 50 मि. मी. पेक्षा जास्त, दर 500 रुपये प्रति हजार.
  • प्रजाती : रोहू – मत्स्यजीरे, आकार 8 ते 12 मि.मी., दर 800 रुपये प्रति लाख. बिजाचा प्रकार : मत्स्यबीज, आकार 12 ते 25 मि.मी., दर 125 रुपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : अर्ध बोटुकली, आकार 25 ते 50 मि. मी., दर 250 रुपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : बोटुकली, आकार 50 मि. मी. पेक्षा जास्त, दर 500 रुपये प्रति हजार. प्रजाती : कटला – मत्स्यजीरे, आकार 8 ते 12 मि. मी., दर 1000 रुपये प्रति लाख. बिजाचा प्रकार : मत्स्यबीज, आकार 12 ते 25 मि. मी., दर 150 रुपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : अर्ध बोटुकली, आकार 25 ते 50 मि. मी., दर 350 रुपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : बोटुकली, आकार 50 मि. मी. पेक्षा जास्त, दर 600 रुपये प्रति हजार.
  • प्रजाती : गवत्या चंदेऱ्या – मत्स्यजीरे, आकार 8 ते 12 मि. मी., दर 1000 रुपये प्रति लाख. बिजाचा प्रकार : मत्स्यबीज, आकार 12 ते 25 मि. मी., दर 150 रुपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : अर्ध बोटुकली, आकार 25 ते 50 मि.मी., दर 350 रुपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : बोटुकली, आकार 50 मि. मी. पेक्षा जास्त, दर 600 रुपये प्रति हजार.
  • प्रजाती : सायप्रिनस – मत्स्यजीरे, आकार 8 ते 12 मि.मी., दर 1000 रुपये प्रति लाख. बिजाचा प्रकार : मत्स्यबीज, आकार 12 ते 25 मि. मी, दर 150 रुपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : अर्ध बोटुकली, आकार 25 ते 50 मि. मी., दर 350 रुपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : बोटुकली, आकार 50 मि. मी. पेक्षा जास्त, दर 600 रुपये प्रति हजार.
  • प्रजाती : पंगेशियस – मत्स्यजीरे : आकार 9 ते 20 मि. मी., दर 400 रुपये प्रति लाख. आकार 21 ते 35 मि. मी., दर 800 रुपये प्रति लाख. आकार 36 ते 50 मि. मी., दर 800 रुपये प्रति लाख, आकार 51 ते 80 मि. मी., दर 2000 रुपये प्रति लाख, आकार 81 ते 120 मि.मी, दर 3000 रुपये प्रति लाख. प्रजाती : गिप्ट तिलापिया – मत्स्यजीरे : आकार 9 ते 20 मि.मी, दर 1000 रुपये प्रति लाख. आकार 21 ते 35 मि.मी, दर 2000 रुपये प्रति लाख. आकार 36 ते 50 मि. मी, दर 3000 रुपये प्रति लाख, आकार 51 ते 80 मि.मी., दर 4500 रुपये प्रति लाख, आकार 81 ते 120 मि. मी., दर 7000 रुपये प्रति लाख.
  • प्रजाती : स्कॅम्पी – पीएल 20 : 2 रुपये प्रति नग.