भाजपाचे देऊळगाव राजात आंदोलन; बसस्‍थानक चौकात घोषणाबाजी

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या १२ भाजपा आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ देऊळगाव राजात काल, ६ जुलैला आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या शहर व तालुका शाखेतर्फे बसस्थानक चौकात घोषणाबाजी करण्यात आली. तहसीलदार सारिका भगत यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस गणेश मांटे, तालुकाध्यक्ष विठोबा …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ओबीसींच्‍या राजकीय आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या १२ भाजपा आमदारांचे निलंबन केल्याच्‍या निषेधार्थ देऊळगाव राजात काल, ६ जुलैला आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्‍या शहर व तालुका शाखेतर्फे बसस्थानक चौकात घोषणाबाजी करण्यात आली. तहसीलदार सारिका भगत यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस गणेश मांटे, तालुकाध्यक्ष विठोबा मुंढे, शहराध्यक्ष प्रविण धन्नावत, डॉ. सुनिल कायंदे, संचित धन्नावत, ॲड. श्री. भालेराव, धर्मराज हनुमंते, शंकर तलबे, विकास डाईफोडे, शिवाजी काकड आदी उपस्‍थित होते.