भाजपच्या आंदोलनामुळे झाकोळले काँग्रेसचे आंदोलन!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कालचा दिवस भाजपाच्या आंदोलनांनी गाजवला. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्त्य साधून भाजपाने आंदोलनाचे नियोजन केल्याने, काँग्रेसनेही पुढे येत ओबीसींच्याच आरक्षणासाठी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले. मात्र भाजपाच्या आंदोलनापुढे काँग्रेसचे आंदोलन नावालाही नव्हते. भाजपाने आंदोलनाची केलेली तयारी, त्यासाठी घेतलेल्या बैठका यामुळे आंदोलन यशस्वी झाले. मात्र काँग्रेसने केवळ एक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कालचा दिवस भाजपाच्‍या आंदोलनांनी गाजवला. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्त्य साधून भाजपाने आंदोलनाचे नियोजन केल्याने, काँग्रेसनेही पुढे येत ओबीसींच्‍याच आरक्षणासाठी केंद्र सरकारच्‍या विरोधात आंदोलन केले. मात्र भाजपाच्‍या आंदोलनापुढे काँग्रेसचे आंदोलन नावालाही नव्हते. भाजपाने आंदोलनाची केलेली तयारी, त्‍यासाठी घेतलेल्या बैठका यामुळे आंदोलन यशस्वी झाले. मात्र काँग्रेसने केवळ एक पत्रक काढून निषेध आंदोलनाचे केलेले आवाहन अपयशी ठरले असेच म्‍हणावे लागेल.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी चिखलीत जयस्तंभ चौकात आंदोलन केले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचे खापर त्यांनी केंद्र सरकारवर फोडले. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली आणि आंदोलन संपवले. या आंदोलनात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अतहरोद्दीन काझी, दीपक देशमाने, नंदकिशोर सवडतकर, अ.रफीक अ.कादर, डॉ.सत्येंद्र भुसारी, डॉ. मो. इसरार, डॉ. अमोल लहाने, प्रदीप पचेरवाल, ॲड. प्रशांत देशमुख, नासीर सौदागर, ॲड. विलास नन्हई, बंडू कदम, अकिल मामू, छोटू अवसरमोल, गोकुळ शिंगणे, जाकिरभाई, समाधान गिते यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक गजानन खंडारे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी केले. आभार डॉ.अमोल लहाने यांनी मानले.

बुलडाण्याच्या जयस्तंभ चौकात बोटावर मोजण्याइतक्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारचा निषेध केला. तालुका व शहर काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सतिश महेंद्रे, सुनिल सपकाळ, तालुकाध्यक्ष सुनिल तायडे, शहराध्यक्ष दत्ता काकस, श्लोकानंद डांगे, अॅड. राज शेख , चिंटू परसे, अमिन टेलर, सुरेश सरकटे, शेख मुजाहिद, अभय सोनोने, शेख जावेद, पल्लू गाडेकर आदी उपस्थित होते. मलकापुरात आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार राजेश एकडे, अरविंद कोलते, नगराध्यक्ष हरीश रावळ, हाजी रशीदखाँ जमादार, बंडू चौधरी, राजू पाटील, प्रमोद पाटील, जावेद कुरेशी उपस्थित होते.