बुलडाण्यात बिबट्या अन् अस्वलाला काढणार बाहेर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यात लवकरच अस्वल अन् बिबट्या मोकळा सोडण्यात येणार आहे… घाबरलात ना… अहो घाबरून नका. मोकळा सोडणार म्हणजे त्यांना सध्या झाकून ठेवलंय आणि आता बाहेर काढणार आहेत… पुन्हा दचकू नका हो… हे पुतळे आहेत.. जे त्रिशरण चौक आणि स्टेट बँक चौकात बसवलेले आहेत. त्यांचे लोकार्पण 26 जानेवारीला होणार आहे. तब्बल साडेतीन …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यात लवकरच अस्वल अन् बिबट्या मोकळा सोडण्यात येणार आहे… घाबरलात ना… अहो घाबरून नका. मोकळा सोडणार म्हणजे त्यांना सध्या झाकून ठेवलंय आणि आता बाहेर काढणार आहेत… पुन्हा दचकू नका हो… हे पुतळे आहेत.. जे त्रिशरण चौक आणि स्टेट बँक चौकात बसवलेले आहेत. त्यांचे लोकार्पण 26 जानेवारीला होणार आहे.

तब्बल साडेतीन लाख रुपये खर्चून त्रिशरण चौकात बिबट्याचा पुतळा साकारला आहे. अनेक महिन्यांपासून तो प्लास्टिकच्या आवरणात बंदिस्त आहे. स्टेट बँक चौकातही असाच अस्वलाचा पुतळा सध्या प्रतीक्षेत आहे. वरिष्ठ वन अधिकार्‍यांकडे याबाबत काल बुलडाणा लाइव्हने चौकशी केली असता 26 जानेवारीला पुतळ्यांचे अनावरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.