बुलडाण्यात घराला आग, सुदैवाने हानी नाही..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील विदर्भ हौसिंग सोसायटीत इंटरनेट केबलमुळे शॉर्टसर्किट होऊन कपिल सुरोशे यांच्या घराला आग लागली. ही बाब नागरिकांच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. आज, 2 जून रोजी पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. नागरिकांनी पाणी व रेती टाकून आग विझविली. या घराशेजारी 10 ते 15 घरे लागूल होती. आग …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील विदर्भ हौसिंग सोसायटीत इंटरनेट केबलमुळे शॉर्टसर्किट होऊन कपिल सुरोशे यांच्‍या घराला आग लागली. ही बाब नागरिकांच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. आज, 2 जून रोजी पहाटे अडीचच्‍या सुमारास ही घटना घडली. नागरिकांनी पाणी व रेती टाकून आग विझविली. या घराशेजारी 10 ते 15 घरे लागूल होती. आग वेळीच लक्षात आली नसती तर या घरांतही आग शिरली असतील.