पेट्रोलची शंभरी पार…बुलडाण्यात पंपावरच वाटले पेढे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेट्रोल, डिझेल दरवाढीचा काँग्रेसने बुलडाण्यात अनोख्या पद्धतीने निषेध केला. दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी आज, 29 मे रोजी गांधीगिरी करत पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना पेढे वाटले. हिरोळे पेट्रोलपंपावर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात कॉंग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस, जिल्हा सरचिटणीस सुनिल सपकाळ, अॅड. राज शेख, शेख मुजाहिद, चिंटू परसे, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेट्रोल, डिझेल दरवाढीचा काँग्रेसने बुलडाण्यात अनोख्या पद्धतीने निषेध केला. दरवाढ कमी करण्याच्‍या मागणीसाठी आज, 29 मे रोजी गांधीगिरी करत पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना पेढे वाटले.

हिरोळे पेट्रोलपंपावर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात कॉंग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस, जिल्हा सरचिटणीस सुनिल सपकाळ, अ‍ॅड. राज शेख, शेख मुजाहिद, चिंटू परसे, अमीन टेलर यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. बुलडाणा शहरात भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलचे दर 101.57 पैसे प्रति लिटरपर्यंत धडकले आहेत, तर डिझेल 92.04 पैसे प्रति लिटर भावाने मिळत आहे. इंडियन ऑईलच्या पेट्रोलची किंमत प्रति लिटर 101.50 पैसे तर प्रति लिटर डिझेलचे दर 91.97 पैसे झाले आहे.