पावसाची पुन्हा उघडीप; २९ ऑगस्टनंतर पुन्हा जास्त पाऊस; तोपर्यंत उरकून घ्या “ही’ कामे

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गेल्या ४ ते ५ दिवसांत जिल्ह्यात बऱ्यापैकी सार्वत्रिक पाऊस बरसल्यानंतर आज, २५ ऑगस्टपासून २८ ऑगस्टपर्यंत उघडीप राहण्याची शक्यता आहे. २५ व २६ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्यात २९ ऑगस्टनंतर २ सप्टेंबरपर्यंत पुन्हा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे …
 
पावसाची पुन्हा उघडीप; २९ ऑगस्टनंतर पुन्हा जास्त पाऊस; तोपर्यंत उरकून घ्या “ही’ कामे

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गेल्या ४ ते ५ दिवसांत जिल्ह्यात बऱ्यापैकी सार्वत्रिक पाऊस बरसल्यानंतर आज, २५ ऑगस्टपासून २८ ऑगस्टपर्यंत उघडीप राहण्याची शक्यता आहे. २५ व २६ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जिल्ह्यात २९ ऑगस्टनंतर २ सप्टेंबरपर्यंत पुन्हा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवानी शेतातील परिपक्व झालेल्या मूग व उडीद पिकांची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. उघडीप असलेल्या कालावधीत कपाशी व तूर पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे करावीत. ज्यामुळे येणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राचे मनिष येदुलवार यांनी केले आहे.